Type Here to Get Search Results !

पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर केले चाकूने वार; पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल



पुणे : विमाननगर परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय पतीने २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार करत पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नीने विमानतळ पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक लक्ष्मण आढाव (३१) असे पत्नीवर वार करणाऱ्या आरोपी पतीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व आरोपी हे पती व पत्नी आहेत. ३ डिसेंबर रोजी विमाननगर परिसरातील हॉ टेल बॅकस्टेज पती अशोक हा पत्नीला घेऊन गेला. तेथे गेल्यावर अशोक याने पत्नीला तुझे लफडे दुसऱ्या मुलाबरोबर  आहे.


 असे बोलून शिवीगाळ करुन मारहाण केली. यानंतर पीडित महिला हॉटेलमधून निघून बाहेर थांबली असता, पतीने पुन्हा बाहेर येत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच ‘आता तुला  सोडत नाही, खल्लास करतो’ असे म्हणून स्वतःकडे असलेल्या चाकूने सपासप वार करुन पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पत्नीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies