Type Here to Get Search Results !

आटपाडी मध्ये लाच घेताना तलाठ्याच्या एजंटाला रंगेहाथ पकडले ; जमिनीची नोंद करण्यासाठी मागितली होती लाच : तलाठी व एजंटावर गुन्हा दाखल

सुधाकर कृष्णा कुंभार


माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : तक्रारदाराच्या बक्षीस पत्राची नोंद   करण्यासाठी लाच मागणारा तलाठी व ती लाच स्वीकारणारा एजंट याला लाच स्वीकाताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने आटपाडी महसूल प्रशासनात मोठी खबबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचे वडीलांनी त्यांचे आईचे नावे बोंबेवाडी, ता. आटपाडी येथील जमीन बक्षीसपत्र करून दिली आहे. सदर बक्षीसपत्राची ७ / १२ सदरी नोंद करून देणेसाठी लोकसेवक श्री. सुधाकर कृष्णा कुंभार, तलाठी, पिंपरी खुर्द यांनी तक्रारदार यांचेकडे २,०००/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी २९.१२.२०२३ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २९.१२.२०२३ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये श्री. सुधाकर कृष्णा कुंभार, तलाठी, पिंपरी खुर्द यांनी तक्रारदार यांचे वडीलांचे बक्षीसपत्राची ७ / १२ सदरी नोंद करून ७/१२ उतारा देणेसाठी २,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.



त्यानंतर लागलीच प्राथमिक आरोग्य केंद आटपाडी समोरील रस्त्यावर सापळा लावला असता लोकसेवक श्री. सुधाकर कृष्णा कुंभार, तलाठी, पिंपरी खुर्द यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून २,००० /- रूपये लाच रक्कम श्री. बाळासो बापुराव पाटील, खाजगी इसम याचेकडे देणेस सांगुन लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.



त्या अनुषंगाने लोकसेवक श्री. सुधाकर कृष्णा कुंभार, वय ५५ वर्ष, व्यवसाय – तलाठी पिंपरी खुर्द सजा, ता. आटपाडी जि. सांगली रा. कुंभार मळा, उंटवाडी रोड, मेंढेगीरी, ता. जत जि. सांगली व श्री. बाळासोो बापुराव पाटील, वय ४२, खाजगी इसम रा. पाटील मळा, पांढरेवाडी रोड, आटपाडी ता. आटपाडी जि. सांगली यांचेविरुध्द आटपाडी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.



सदरची कारवाई मा. श्री. अमोल तांबे सो पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक, श्री. विजय चौधरी सोो, अपर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय पुजारी, श्री. विनायक भिलारे, पोलीस अंमलदार अजित पाटील, सलिम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, धनंजय खाडे, अतुल मोरे, चालक अनीस वंटमुरे यांनी केली आहे.



नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक०२३३ / २३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर व मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies