Type Here to Get Search Results !

आटपाडीतील जग्वार सिटीत उद्या प्लॉट धारकांवर होणार बक्षिसांचा वर्षाव : चार अलिशान कार, तीन बुलेटसह विविध बक्षिसांचे होणार वितरण



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील आटपाडी-मुढेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या “जग्वार सिटीत” उद्या १५० प्लॉट धारकांवर दुया दिनांक २१ रोजी सायंकाळी ०५ वाजता बक्षिसांचा वर्षाव होणार असून यामध्ये विजेत्यांना चार अलिशान कार, तीन बुलेट, दोन अॅक्टीव्हा अशा बक्षिसांची सोडत होणार आहे. या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते मिलिंद गुणाजी व सिने अभिनेत्री पूजा सावंत यांच्यासह खासदार संजयकाका पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थित बक्षीस सोडतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.


आटपाडी-मुढेवाडी रस्त्यालगत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ एकर परीसरामध्ये ५०० एन.ए. प्लॉटची अत्याधुनिक “जग्वार सिटी” उभारली गेली आहे. आटपाडीमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात एन.ए. असणारी “जग्वार सिटी” ही एकमेव आहे. या ठिकाणी आकर्षक कमान, अंतर्गत रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, नाना-नानी पार्क, ओपन जीम, अंडरग्राउंड द्रेजेन यासह अनेक सोई-सुविधा उपलब्ध आहेत.


उद्या दिनांक २१ रोजी पहिल्या १५० प्लॉट धारकांसाठी बक्षिसांची सोडत होणार आहे. यामध्ये विजेत्यांवर विजेत्यांना चार अलिशान कार, तीन बुलेट, दोन अॅक्टीव्हा अशा बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. तर सामाजिक जाणीव ठेवत आटपाडी तालुक्यातील १५० आशा स्वयंसेविका यांना सायकल वाटप करण्यात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies