Type Here to Get Search Results !

पलूसमध्ये तलाठ्यास लाच घेताना रंगेहात पकडले : पंधरा दिवसात दुसरा तलाठी लाच घेताना सापडला : महसूलची प्रतिमा कधी सुधारणार !



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : पलूस येथे खरेदी केलेल्या जमिनीची ७/१२ सदरी नोंद करण्यासाठी तब्बल ४० हजार रुपयांची लाच मागून ती स्विकारताना बाळासो जाधव, वय-३९ वर्षे, तलाठो पलूस, ता. पलूस जि.सांगली या तलाठ्यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून  या घटनेने महसूल प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली असून पंधरा दिवसात लाचलुचपतच्या जाळ्यात जिल्ह्यातील सलग दुसरा तलाठी सापडल्याने यामुळे महसूलची प्रतिमा कधी डागाळली गेली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार व त्यांचे वडील यांनी खरेदी केलेल्या जमिनीची ७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता तलाठी बाबुराव बाळासो जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे ४०,००० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी लाचलुचपत पथकास दिला होता.


तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०५ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक बाबुराव बाळासो जाधव, तलाठी पलूस यांनी तक्रारदार व त्यांचे वडील यांनी खरेदी केलेल्या जमिनीची ७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता ४०,००० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३२,००० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.


त्यानंतर दिनांक ०८ रोजी तहसिल कार्यालय, पलूस या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक बाबुराव बाळासो जाधव, तलाठी पलूस यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून ३२,००० हजार रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लोकसेवक बाबुराव बाळासो जाधव, तलाठी पलूस रा. बुर्ली, ता.पलूस जि.सांगली यांचेविरुध्द पलूस पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.


सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, विजय चौधरी सो, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार प्रितम चोगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील,  ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी केली आहे.



लाच मागत असल्यास या ठिकाणी करा तक्रार 

लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्बनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अँप नंबर व मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies