Type Here to Get Search Results !

आटपाडी : पुजारवाडी (दि) च्या उपसरपंच पदी "यांची" बिनविरोध निवड



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (दि) येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी सीताबाई मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यानी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.


महिनाभरापूर्वी उपसरपंच आप्पा मोरे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त होते. या पदासाठी सीताबाई मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक शहाजी रणदिवे यांनी काम पाहिले. सरपंच मिलिन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रीया पार पडली. 


सीताबाई मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी आबासाहेब पुजारी, अविनाश मोरे, विठ्ठल वाघमारे, धनजय मोरे, हरी पवार, सागर पुजारी, सुमित मोरे, समाधान मोरे, समाधान पवार, अमोल मोरे, विष्णू मोरे, शरद मोरे, ब्रह्मदेव मोरे, महादेव वाघमारे, अनुराधा मोरे, कविता मोरे, योगिता मिसाळ, अलका मोरे, प्रतिभा मोरे, पियुश मोरे, सुरेश मोरे आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies