Type Here to Get Search Results !

मुंबई : पोलीस ठाण्यातच शिवसेना नेत्यावर गोळीबार; भाजपा आमदार यांच्यावर गोळीबाराचा आरोप : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमदारांचे गंभीर आरोप



मुंबई : उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यातच दोन नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. 


या घटनेत शिवसेना नेते महेश गायकवाड जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलीस निरिक्षकांच्या केबीनमध्ये या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी हा गोळीबीर झाल्याची माहिती समोर आली आहे. 


मिळालेली माहिती अशी, शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये एका विषयावर वाद होऊन कल्याण शिवसेना शहरप्रमुख शिंदे गट महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरवातीला स्थानिक रुग्णालय व नंतर ठाणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे साथीदार राहुल पाटील व भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मध्ये एका विषयावरून सुरवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व  गोळीबार झाला. यामध्ये महेश गायकवाड यांना ४ तर राहुल पाटील यांना  २ गोळ्या लागल्या आहेत. यांप्रकाराने खळबळ उडून दोन्ही गटाच्या  समर्थकांनी एकच गोंधळ पोलीस ठाणे व परिसरात घातला. 


हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिन मध्ये रात्री अंदाजे ११ वाजता गोळीबार झाला असून यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्या  हाणामारी झाल्याचे प्रकार झाले. असे पोलिसांचे म्हणणे आहे.  आमदार गणपत गायकवाड व सुरक्षा रक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


तसेच गायकवाड यांनी शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. 


तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असेही आमदार गायकवाड म्हणाले.




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies