Type Here to Get Search Results !

आटपाडीच्या ‘युवा’ संगीतकाराचे गायक सुरेश वाडकर यांनी केले कौतुक



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीचे युवा संगीतकार बोधी साऊंड रेकॉर्डिंगचे समाधान ऐवळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याचे कौतक संगीत क्षेत्रातील महान गायक सुरेश वाडकर यांनी स्वत: फोन करून केले. त्याच बरोबर त्यांना भेटायला मुंबईला बोलावत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.


मुळातच प्राथमिक शिक्षक असलेल्या समाधान ऐवळे यांच्या घरात संगीताचे धडे गिरविले जातात. त्यांचा महाराष्ट्र बॅण्ड हा प.महराष्ट्रात नावाजलेल्या बॅण्ड आहे. त्यांनी मुलाना शिक्षणाचे धडे देण्या बरोबरच स्वत: बोधी साऊंड रेकॉर्डिंग या नावाने रेकॉर्डिंग स्टुडीओ सुरु केला.


सुरुवातीच्या काळात आवड असल्याने त्यांनी रेकॉर्डिंगसाठी कॅसीओ घेवून ज्या ठिकाणी रेकॉर्डिंग करायचे आहे त्या ठिकाणी ते जात होते. कालांतराने त्यांनी आसपासच्या तालुक्यामध्ये व जिल्हामध्ये जावून रेकॉर्डिंग करून आणले. हे करत असताना त्यांना शाळेकडे देखील लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे वेळ फार कमी मिळायचा.


नंतर त्यांनी स्वत: आटपाडी येथे सर्वसोईनियुक्त असा भव्य बोधी साऊंड रेकॉर्डिंग या नावाने रेकॉर्डिंग स्टुडीओ सुरु केला. ग्रामीण भागामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करून त्यांनी सुरु केलेल्या या  रेकॉर्डिंग स्टुडीओला संगीत क्षेत्रातील व सिनेमा क्षेत्रातील लोकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला.


परंतु त्यांनी याकडे लक्ष न  देता त्यांनी आपले काम पदरमोड करून सुरूच ठेवले. गणेश जंयतीच्या दरम्यान त्यांनी मराठीतील आघाडीचा गायक रोहित राऊत याच्या आवाजामध्ये ‘देवा मोरया’ हे गीत देखील त्यांनी मुंबई येथील आजीवसन या अवधूत वाडकर यांच्या स्टुडीओ मध्ये रेकॉर्डिंग केले होते. तसेच ‘योट योट झाला’, रिमझिम पावसाच्या सारी’ ही अल्बम गाणी देखील त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. तसेच कोरोना कालावधीत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संगीतबद्ध केलेले ‘देवमाणूस’ हे गाणे देखील लोकप्रिय झाले होते. स्वत: उद्धव ठाकरे यांनी याबद्दल समाधान ऐवळे यांचे कौतुक केले होते.


समाधान ऐवळे यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटातील गाणी अजून रिलीज झाली नसली तरी, आघाडीच्या गायिका वैशाली माडे, मुग्धा वैशपायन, कार्तिकी गायकवाड, केतकी माटेगावकर, स्वप्निल बांदोडकर या गायका बरोबर त्यांनी काम केले असून त्यांच्या आवाजात त्यांनी गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्याच बरोबर नुकताच रिलीज झालेल्या ‘गावकी’ या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले असून त्यातील ‘तुझ्या माझ्या नात्याला सांग नाव काय’ या गाण्याबद्दल सुरेश वाडकर यांनी समाधान ऐवळे यांचे कौतुक केले.


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies