Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य | सोमवार १९ फेब्रुवारी २०२४ | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | काय सांगते तुमची राशी | वाचा सविस्तरमेष : आज दिवसाची सुरुवात चांगली होईल. आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी तुम्ही शक्य ते सर्व प्रयत्न कराल आणि यशस्वी व्हाल. ध्येय गाठण्यासाठी जवळच्या नातेवाईकाचीही साथ मिळेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हावल. वैयक्तिक कामांमधील व्यनस्तीतेमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. आर्थिक स्थितीत थोडी धावपळ देखील शक्य आहे.


वृषभ : अध्यात्मिक आणि गूढ शास्त्र जाणून घेण्यात तुमची आवड वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. एखाद्यात प्रश्नीा चर्चेतून मार्ग निघेल. मात्र, तातडीने निर्णय घेऊन कामाला सुरुवात करणे गरजेचे. तरुणांना काही कारणास्तव करिअरशी संबंधित योजना टाळाव्या लागतील. आज बहुतेक वेळ मार्केटिंग आणि बाहेरील कामे पूर्ण करण्यात जाईल.


मिथुन: आज तुम्ही तुमची कामे योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे काम लवचिकतेने पूर्ण होईल. नाते घट्ट ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. घराची सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर निर्णय घेऊ नका. राग तुमच्यासाठी हानिकारक असेल. जुन्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे.


कर्क : कोणतेही प्रलंबित राजकीय कार्य पूर्ण करण्याची आज योग्य संधी आहे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. गृहिणी आणि नोकरदार महिला त्यांच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडू शकतील. नकारात्मक कृती करणारे लोक तुमची टीका करतील.काळजी करू नका तुमचे नुकसान होणार नाही. आर्थिक निर्णय घाईगडबडीत घेवू नका. व्यापारात सुधारणा होईल.


सिंह : तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवाल. घरात जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमुळे उत्साही वातावरण निर्माण होईल. तुमच्या साध्या स्वभावाचा काही लोक चुकीचा फायदा घेऊ शकतात, याची जाणीव ठेवा. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.


कन्या : आज मालमत्ता किंवा इतर कोणतेही प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुमच्या सामाजिक सीमाही वाढू शकतात. तुमच्या वैयक्तिक कामांमध्ये बाहेरील व्यक्तीला सहभागी करून घेऊ नका. कोणतीही योजना करण्यापूर्वी पुन्हा विचार करणे आवश्यक आहे. तुमच्या स्वतःच्या कामात वारंवार व्यत्यय आल्याने तुम्हाला आळस आणि निष्काळजीपणाचा अनुभव येऊ शकतो.


तूळ : केवळ महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. एखाद्या शुभचिंतकाच्या मदतीने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. घाई आणि भावनेने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. काही गोंधळ झाल्यास घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. छोट्या छोट्या गोष्टींवर ताण येऊ देऊ नका. व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रांत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या राजकारणाचा सामना करावा लागू शकतो.


वृश्चिक : आज काही अडचणी येतील ; पण तुम्ही तुमच्या बुद्धी आणि हुशारीने समस्या सोडवाल. जवळच्या नातेवाईकांसोबत नाते अधिक दृढ होईल. इतरांच्या प्रश्नां्मध्येद हस्तनक्षेप करु नका. विवाहित महिलांनी सासरच्यार मंडळींशी संबंध बिघडू देऊ नयेत. दिवसाच्या सुरुवातीला काही व्यावसायिक समस्यांमुळे त्रास होईल. तुम्ही सुज्ञ पद्धतीने गोपनीयतेची काळजी घ्याल.


धनु : जवळचे मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. काही महत्त्वाचे काम केल्याने मन प्रसन्न राहील. संयम आणि शहाणपणाने उपाय शोधण्याची हीच वेळ आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ लाभदायक ठरू शकतो. कौटुंबिक जीवन सुखकर होऊ शकते. मानसिक तणाव आणि रक्तदाबाशी संबंधित समस्यांमुळे समस्या वाढू शकतात.


मकर : अपेक्षेप्रमाणे निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. घाई आणि भावनेने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. काही स्वप्ने अपूर्ण राहिल्याने मन थोडे निराश होऊ शकते. आज व्यावसायिक कामे मंदावतील. महिलांना सांधेदुखी किंवा स्त्रीशी संबंधित आजारांचा त्रास होईल.


कुंभ : अनेक दिवसांपासून विस्कळीत असलेल्या गोष्टी आज पुन्हा व्यवस्थित होऊ लागतील. आज कोणताही निर्णय घेताना तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. तुम्हाला नक्कीच योग्य सल्ला मिळेल. भावंडांच्या नात्यात गोडवा ठेवा. तसेच, मुलांच्याा संगतीकडे लक्ष देणे आवश्य्क. आज प्रवास टाळा. व्यवसायासाठी काळ अनुकूल आहे.


मीन : प्रत्येक स्तरावर काळजीपूर्वक विचार करा. तुमची प्रतिभा वाढवण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. एखाद्या गोष्टीमुळे घरातील वातावरण खराब होऊ शकते. आवश्यक कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. पती-पत्नीच्या नात्याात मधूरता येईल. 


(टीप : यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, केवळ माहिती पोहचविणे हा उद्देश)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies