Type Here to Get Search Results !

चमकोगिरी : चार ठिकाणी अर्ज भरल्याने “या” महाराजावर होणार गुन्हा दाखल



सोलापूर लोकसभा मतदारसंघासह इतर चार ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज भरताना ही माहिती लपवल्याने व्यंकटेश्वरा महास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे, सोलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.


मुळचे चडचण येथील रहिवासी असलेले दीपक ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी अर्ज घेऊन भरला होता. मात्र, त्यांनी सोलापूर बरोबरच इतर चार ठिकाणाहून अर्ज भरल्याचे दिसून येते, ही गोष्ट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.


व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी चार ठिकाणहून अर्ज दाखल केले होते. त्यात सोलापूर, विजयपूर, अमरावती, नागपूर लोकसभा मतदारसंघातून महास्वामी यांनी आपला अर्ज दाखल केला होता. पण, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एका उमेदवाराला दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज भरता येत नाहीत. अर्ज दाखल करतेवेळी प्रतिज्ञापत्रात हे नमूद करणे बंधनकारक आहे.


प्रतिज्ञापत्र सादर करताना महास्वामी यांनी आपण चार ठिकाणाहून अर्ज भरत असल्याची माहिती लपवली होती. त्यांचा अर्ज बाद ठरला होता. पण, त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांना नोटिस बजावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies