Type Here to Get Search Results !

आटपाडी : माडगुळे च्या सुपुत्राला ॲमेझॉन कडून एक कोटीची ऑफर



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी: येथील आदित्य शिवाजी विभुते या युवकास जर्मनी स्थित ॲमेझॉन कंपनीकडून सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनियर या पदासाठी एक कोटीची ऑफर दिलेली आहे. आदित्य विभूते यांने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्रीनगर (जम्मू कश्मीर) येथून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात २०२३ साली बी.टेक.पूर्ण केलेले आहे. 


२०२२ या वर्षांमध्ये सहा महिन्यासाठी ॲमेझॉन कंपनीने त्याची इंटर्नशिप साठी निवड केली होती. या कालावधीत त्यांने कंपनीसाठी केलेल्या कामावरून ॲमेझॉन कंपनीने जर्मनी स्थित बर्लिन शहरांमध्ये त्याची पूर्णवेळ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड केली आहे व त्याला १ कोटीचे पॅकेज देऊ केले आहे. यापूर्वी आदित्यची निवड सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून जर्मनी स्थित बर्लिन  शहरांमध्ये डॉईश बँक मध्ये झाली होती. सध्या तो नेदरलँड या देशाच्या एका स्टार्टअप मध्ये इंजीनियर म्हणून काम पाहत आहे. 


त्याचे प्राथमिक शिक्षण डायनामिक इंग्लिश मीडियम स्कूल आटपाडी माध्यमिक शिक्षण श्री भवानी हायस्कूल आटपाडी तर उच्च माध्यमिक शिक्षण कोटा राजस्थान येथे झालेले आहे. आदित्य हा आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील सर्पमित्र डॉ.शिवाजी विभुते व श्रीमती वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल आटपाडी येथील सहशिक्षिका सौ.भावना विभुते यांचा मुलगा आहे. 


त्याच्या या यशाबद्दल माडगुळे गावातील सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे व ही माडगूळे गावाला भूषणावह गोष्ट असल्याची सांगितले. आदित्यने आपल्या यशाचे श्रेय त्याला लाभलेल्या सर्व शिक्षक, मार्गदर्शक, आई वडील व स्वतः घेतलेल्या कष्टाला दिले आहे. प्रा. विलास सुर्वे कुटुंबीयांकडून आदित्य विभूतेचे अभिनंदन करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies