Type Here to Get Search Results !

देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच संजयकाका पाटील यांना विचारला जाब ; भाजपमधील अंर्तगत गटबाजी उघडमाणदेश एक्सप्रेस न्युज : कडेगाव : सांगली लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी जाब विचारल्याने भाजप मधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.


खासदार संजय काका यांना तिकीट मिळू नये म्हणून देखील पक्षांतर्गत मोर्चेबांधणी झाली होती मात्र हा संघर्ष मोडीत काढून संजय काका यांनी तिसऱ्यांदा भाजपचे तिकीट मिळवले मात्र भाजपमधील अंतर्गत भात मिटवण्यात अद्याप त्यांना यश आले नसल्याचे दिसून येते.


कडेगाव येथे खासदार संजय काका यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल दिनांक २७ रोजी जाहीर सभा संपन्न झाली. या जाहीर सभेमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी थेट खासदार संजय काका यांच्यावरच हल्लाबोल केला. काका गेल्या दहा वर्षात तुम्ही आमच्या कार्यकर्त्या सोबत दुजाभाव केला आहे असा आरोप करत देशमुख गटाची खदखद बाहेर काढली. 


संग्राम देशमुख म्हणाले, खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांना लोकसभा पृथ्वीराज बाबांना मिळावी  यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करत होतो. असे सांगत मागील वेळी आम्ही मदत करून सुद्धा आम्हाला दुसऱ्याची मदत झाली हे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा पृथ्वीराज देशमुख व संजयकाका यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies