Type Here to Get Search Results !

सांगली: आज काँग्रेसची बैठक ; बंडखोर विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार होणार का?



काँग्रेसचे विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीतून बंडखोरी केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांची आज सांगली येथे तातडीची बैठक होत आहे. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.


पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिलेली नसताना लोकसभा निवडणुकीत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मविआबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून पक्षाची अधिकृत भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस पक्षाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


दरम्यान, विशाल पाटील यांनी बंडखोरी करून आपली उमेदवारी कायम ठेवल्याबद्दल त्यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता पक्षिय पातळीवरून व्यक्त केली जात असून उबाठा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी तशी मागणीही काँग्रेसकडे केली आहे. यामुळे या बैठकीत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांच्याकडून कारवाई केली जाण्याची चिन्हे आहेत.


तर, आपण पक्षाचा कोणताच आदेश डावललेला नाही. यामुळे आपल्यावर निलंबनाची कारवाई होऊच शकत नसल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. पक्षाकडून काय करायचे, अथवा काय नाही करायचे याच्या कोणत्याच सूचना आलेल्या नाहीत. अथवा लेखी खुलासाही मागविला नाही. यामुळे माझ्यावर पक्षाकडून कारवाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies