Type Here to Get Search Results !

UP Topper विद्यार्थिनीला करावा लागला शारीरिक ट्रोल्सचा सामना; म्हणाली.....


 

 त्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषदेचा दहावी व बारावी इयत्तेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यामध्ये सीतापूरची रहिवासी असलेल्या प्राची निगमने राज्यात पहिला क्रमांक पटकावला, तिला ६०० पैकी तब्बल ५९१ गुण प्राप्त झाले आहे. ९८.५ टक्के मिळवलेल्या प्राचीचे अभिनंदन करणारे पोस्टर व फोटो व्हायरल होऊ लागताच तिने व तिच्या कुटुंबाने स्वप्नातही विचार केला नसेल अशा भयंकर ट्रोलिंगचा सामना त्यांना करावा लागला. प्राचीच्या चेहऱ्यावरील केसामुळे लोकांनी तिला “तू मुलगी आहेस का”, असे प्रश्न विचारायला सुद्धा मागे पुढे पाहिले नाही. या सर्व ट्रोलर्सना प्राचीने अलीकडेच एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे.


बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना संबोधित करताना प्राची म्हणाली की, “ युपी बोर्डात मी टॉप केल्यावर मी व्हायरल झाले, टॉप केलं नसतं, कदाचित एक-दोन मार्क कमी पडले असते तरी बरं झालं असतं असं आधी वाटलं होतं. पण देवाने मला जसं बनवलंय तशी मी छान आहे. ज्यांना त्यात काही फरक वाटतो त्यांच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही. लोकांनी यापूर्वीही ट्रोल केलंच होतं पण यावेळी प्रमाण जास्त होतं. मी आतापर्यंतच्या आयुष्यात अनेकदा या गोष्टी ऐकल्या आहेत. पण मला याचा फरक पडत नाही, मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. पण ट्रोल होत असताना असेही काही लोक होते ज्यांनी मला पाठिंबा दिला, मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत.”




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies