Type Here to Get Search Results !

व्हिडीओ : सांगली लोकसभेसाठी घोड्यावर येवून भरला उमेदवारी अर्जमाणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली लोकसभा निवडणूकिसाठी स्वाभिमानी पक्षाच्या महेश खराडे यांनी  घोड्यावरून जाऊन अर्ज भरला. लोकसभा निवडणुकीत साखर सम्राट प्रमुख उमेदवार असल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठीच लोकसभेच्या रणागणात उडी घेतली असून, ही लढाई जिकू असा विश्वास यावेळी उमेदवार महेश खराडे यांनी व्यक्त केला.


विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रॅलीला प्रारंभ झाला. महेश खराडे घोड्यावर स्वार झाले. तर धोतर घातलेले शेतकरी बैलगाडीत बसले. ऊसाने सजविलेल्या ट्रॅक्टर मध्ये शेतकरी बसून ही रॅली सुरु झाली. मोठ्या प्रमाणात शेतकरी चालत घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. ‘एकच गट्टी राजू शेट्टी’, ‘महेश भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’  घोषणांनी परिसर दणाणून गेला. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आली. त्यानंतर पोपट मोरे, संदीप राजोबा, अनिल पवार, अजित हलीगले, भरत चौगुले, राजेंद्र माने आदिसह अन्य जणांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या कडे अर्ज सादर केला.


त्यानंतर झालेल्या सभेत महेश खराडे म्हणाले,  उसाचा दर पाच हजार करणे, गाईच्या दुधाला 35 रुपये हमीभाव करणे, द्राक्ष बेदाणा खाणे कसे हितकारक आहे हे सांगणारी जाहिरात टी व्ही वर सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.  सांगली जिल्ह्यात मोठे उद्योग व्यवसाय आणणे, महापालिका क्षेत्रात शुद्ध पाणी पुरविण्यासाठी प्रयत्न करणे, ड्रायपोर्ट, लॉजस्टिक पार्क आदीची उभारणी हे ध्येय डोळ्यसमोर ठेवून ही निवडणूक लढवीत आहेत. साखर सम्राटांची मनमानी थांबविण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे,संदीप राजोबा, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष अनिल पवार, सुरज पाटील, जयपाल चौगुले, प्रशांत महाडिक आदीची भाषणे झाली. यावेळी अमित रावतळे, राजेंद्र पाटील, रावसाहेब पाटील, सुधाकर पाटील, पिरगोंडा पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, धोंडीराम पाटील, निशिकांत पोतदार, उत्तम चंदनशिवे, बाळासाहेब जाधव, इम्रान पटेल, सिकंदर शिकलगार, श्रीधर उदगावे, बाळासाहेब लिंबेकाई, उमेश मुळे, पारस चौगुले, अशोक खाडे, भुजंग पाटील, शिवाजी पाटील, गुलाब यादव, अजित हलीगले, सुभाष पाटील, बाळासो खरमाटे, विजय रेंदाळकर, पंढरीनाथ जाधव, नारायण जाधव, भीमराव निकम, प्रदीप लाड, देवानंद मोहिते, विशाल पाटील, प्रकाश पाटील, आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies