Type Here to Get Search Results !

1 मे पासून होणार बँक आणि पैशांशी संबंधित काही महत्त्वाचे बदल; जाणून घ्या ‘काय’ आहेत हे नवीन बदल

 


1 May Rules Change: एक मेपासून पैसे आणि बँकांशी संबंधित होणार मोठे बदल, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

नवीन आर्थिक वर्षाचा (2024-25) पहिला महिनाही आता संपण्याच्या मार्गावर उभा आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर पडू शकतो. अशा स्थितीत, तुम्हाला नवीन बदलांची माहिती असणे आवशयक आहे.


नवी दिल्ली : एप्रिल महिन्याचा शेवट जवळ आला आहे. अशा परिस्थितीत मे, नवीन महिन्याच्या सुरुवातीसह बँकांशी संबंधित अनेक नियम बदलतील, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. IDFC फर्स्ट बँक, येस बँक आणि ICICI बँकेचे नियम १ मे पासून बदलणार असून आता बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणे महाग होईल कारण क्रेडिट कार्डधारकांना जास्त अधिभार भरावा लागेल. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच LPG सिलिंडरच्या किंमतीत आणि आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यांवरील शुल्कामध्ये अनेक बदल दिसून येतील. त्यामुळे पुढील महिन्यात पैशांशी संबंधित नियमांमध्ये कोणते बदल पाहायला मिळू शकतात ते जाणून घेऊया.


येस बँकेच्या किमान शिल्लक मर्यादेत बदल


येस बँकेच्या किमान शिल्लक मर्यादेत बदल


येस बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार विविध प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लकमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता येस बँकेच्या प्रो-मॅक्स बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक ५०,००० रुपये आणि कमाल शुल्क १,००० रुपये करण्यात आले आहे. तसेच “प्रो प्लस”, “S रिस्पेक्ट एसए” आणि “येस एसेन्स एसए” खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक मर्यादा रुपये २५,००० आणि कमाल शुल्क ७५० रुपये असेल. “Account Pro” मध्ये किमान शिल्लक रुपये १०,००० आणि कमाल शुल्क ७५० रुपये आहे.



शहरवासीयांना अधिक शुल्क भरावे लागणार


शहरवासीयांना अधिक शुल्क भरावे लागणार


ICICI बँकेच्या सेव्हिंग कार्डशी संबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत. आता ग्रामीण भागातील ग्राहकांना डेबिट कार्डसाठी ९९ रुपये तर शहरी भागातील खातेदारांना २०० रुपये वार्षिक शुल्क भरावे लागतील. यासोबतच बँकेने २५ पानांच्या चेकबुकसाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यानंतर चेकबुकच्या प्रत्येकपानासाठी ४ रुपये शुल्क भरावे लागतील. IMPS व्यवहाराची रक्कम प्रति व्यवहार २.५० ते १५ रुपये निश्चित करण्यात आली आहे.


कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य


कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य


महाराष्ट्र सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार आता महत्त्वाच्या कागदपत्रांवर आईचे नावही अनिवार्य असणार आहे. राज्य सरकारचा आदेश १ मेपासून लागू होणार असून यानुसार आता जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेची कागदपत्र, आधार आणि पॅन कार्डवर आईचे नाव अनिवार्य असेल.


ज्येष्ठ नागरिकांना वाढीव संधी


ज्येष्ठ नागरिकांना वाढीव संधी


HDFC बँकेने नुकतेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना लाँच केली ज्यामध्ये १० मे पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ०.७५ टक्क्यांचा अतिरिक्त व्याजदर उपलब्ध आहे, ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना पाच ते १० वर्षांच्या एफडी योजनेवर ७.७५% व्याजदराचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे, या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिक पाच कोटी रुपये जमा करू शकतात.


एलपीजी किंमतीत बदल


एलपीजी किंमतीत बदल


प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीचा आढावा घेतात, त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. दरात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies