Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग : माजी पंतप्रधान पुत्र, नातू यांना अटक ; न्यायालयाचा अंतरिम जामीन देण्यास नकार...



माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र आणि  जनता दल धर्मनिरपेक्ष ( जेडी(एस) पक्षाचे नेते एचडी रेवन्ना यांना  आज ( दि. ४) कर्नाटक सरकारच्या् विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांनी अटक केली. 


बंगळुर केआर नगर पोलीस ठाण्यानत नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भात ही कारवाई करण्याीत आल्याधचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्यातन, कथित सेक्सक स्कँाडल प्रकरणी एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.


कथित सेक्से स्कँणडल प्रकरणी हसन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रज्वल रेवन्ना आणि त्यांचे वडील एचडी रेवन्ना यांच्यासाठी अडचणी आणखी वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रज्वतल रेवन्नाी यांच्यााविरोधात ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ काढण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. दरम्यान, एचडी रेवन्ना देशसोडून पळून जाण्यांची शक्योता लक्षात घेता त्यांयना लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. या प्रकरणी सुमारे ७०० जणांनी राष्ट्रीय महिला आयोगाला (NCW) खुले पत्र लिहून रेवन्ना यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


प्रज्ज्वल यांचे महिलांसह आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाले. महिलांवर दबाव आणून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीडितांमध्ये काही शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येते. यानंतर कर्नाटक राज्य महिला आयोगाने २६ एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. विशेष तपास पथक नेमावे, असेही राज्य सरकारला सुचविले होते. त्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. दरम्यान, प्रज्वल रेवन्ना यांचा सहभाग असलेल्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे एफआयआर पाठवण्यात आला आहे.


प्रज्वल रेवन्ना हे हसन लोकसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार आहेत. येथे गेल्या शुक्रवारी मतदान पार पडले. काही आक्षेपार्ह व्हिडिओंवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रज्वल रेवन्ना यांना JD(S) मधून निलंबित करण्यात आले. दरम्यान, एच.डी. रेवन्ना यांनी त्यांचा मुलगा प्रज्वल आणि ते स्वत: त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी तयार आहेत आणि आरोप सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कारवाईला सामोरे जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies