Type Here to Get Search Results !

विटा येथे “या” स्थलसिमा हद्दीत मनाई आदेश जारी



माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दि. 3 मे 2024 रोजीच्या सांगली जिल्हा दौरा व  विटा येथील सभेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरीता जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा ते लेंगरे रोड विटा या ठिकाणच्या 2 कि.मी. त्रिज्येच्या स्थलसिमा हद्दीत दि. 3 मे 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते 23.59 वाजेपर्यंत पुढील कृत्यांना मनाई केली आहे.


या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा ते लेंगरे रोड विटा या दरम्यान आंदोलने करणे तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगणे यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरात व्हीव्हीआयपी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणीही बेकायदेशीरपणे ड्रोनव्दारे प्रसारण करण्यास व ड्रोन उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 


कोणीही व्यक्ती इंन्स्टाग्राम, व्हॉटसअप, व्टिटर, फेसबुक इत्यादी समाज  माध्यमाव्दारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवणार नाही. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकूराचे फ्लेक्स, बोर्ड व आक्षेपार्ह घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies