आटपाडीत आज दि. २२ रोजी रक्त तपासणी मोहीम

आटपाडीत आज दि. २२ रोजी रक्त तपासणी मोहीम


आटपाडीत आज दि. २२ रोजी रक्त तपासणी मोहीम
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/सचिन कारंडे : आटपाडी शहरामध्ये डॉ. श्रीनाथ पाटील यांचे जीवन ज्योती हॉस्पिटल येथे रविवार दि. 23 रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत रक्तदान तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. आटपाडी शहरामध्ये प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीन करण्यात आले आहे.  सकाळी रक्त तपासणीसाठी येताना उपाशी पोटी यावे. सर्व  चाचण्यासाठी ४१०० खर्च असून फक्त तपासणीमध्ये केवळ ९९९ रुपयामध्ये सर्व टेस्ट तपासण्या होणार आहेत. 
शरीराच्या उत्तम प्रकृतीची माहिती देणाऱ्या महत्त्वाच्या चाचण्या करण्यात येणार असून चाचण्यांद्वारे निदान होणारे संभाव्य आजार डायबिटीस, हार्टअटॅक, मूत्रविकार, पॅरॅलिसिस, कॅन्सर, लिव्हरचे विकार, थायरॉईड, ग्रंथीचे विकार, अनेमिया या विकारांच्या निदानामुळे येणाऱ्या संकटावर योग्य वेळीच उपचार करून निरोगी व समृद्ध जीवन जगता येणार आहेत. सदरच्या चाचण्या ह्या डॉ. श्रीनाथ पाटील यांचे जीवन ज्योती हॉस्पिटल वरदान मेडिकल समोर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या असून अधिक माहितीसाठी  संपर्क  9 0 4 71 50 52 व  9689872496 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments