नागरिक सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

नागरिक सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

 माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस येथे नागरिक सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काल शहरात हनुमान मंदिर पासून बस स्टँड पोलीस स्टेशन चौक ते नगरपंचायत चौक अशी रॅली काढण्यात आली तर समर्थन दर्शनाचे पत्र माळशिरस तहसीलदार यांना देण्यात आले.
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे संविधानातील समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन होत नाही. सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार रास्त वर्गीकरणाचा अधिकार घटनेने शासन संस्थेला दिला आहे.  या  रॅलीचे उद्दिष्टाने तमाम देश प्रेमी व सर्वधर्म बांधव यांच्यावतीने नागरिकत्व कायद्याचे महत्त्व व वास्तव सर्वांना समजावे हा या हेतूने ही रॅली काढण्यात आलेली होती. यावेळी रॅलीला एम.पी.  कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a comment

0 Comments