आटपाडीत परीट समाज संघटनेतर्फे फराळाचे वाटप

आटपाडीत परीट समाज संघटनेतर्फे फराळाचे वाटप


आटपाडीत परीट समाज संघटनेतर्फे फराळाचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/सचिन कारंडे : आटपाडी शहरामध्ये परीट समाज संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबा मठ चौंडेश्वरी कॉलनी येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 144 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 11 वाजता आटपाडीचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त परीट समाज बांधवांतर्फे श्री कल्लेश्वर मंदिरात दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. 
दरवर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येतो. सर्व परीट समाजाने या उत्सवात सहभागी होऊन आपले योगदान दिले. या  उपक्रमाचे आटपाडी शहरांमध्ये व परिसरामध्ये परीट समाज बांधवांचे व संघटनेचे कौतुक होत आहे. फराळासाठी येणारा खर्च सर्व परीट समाज बांधवाना तर्फे करण्यात आला. 


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


 


Post a comment

0 Comments