पळशीतील युवकांची २२ लाखांना फसवणूक ; पणन विभागात नोकरीस लावतो म्हणून पैसे घेतले ; फसवणूक करणारा भामटा नाशिकचा ; म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल 

पळशीतील युवकांची २२ लाखांना फसवणूक ; पणन विभागात नोकरीस लावतो म्हणून पैसे घेतले ; फसवणूक करणारा भामटा नाशिकचा ; म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल 


पळशीतील युवकांची २२ लाखांना फसवणूक 
पणन विभागात नोकरीस लावतो म्हणून पैसे घेतले ; फसवणूक करणारा भामटा नाशिकचा ; म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागात माझी मोठी ओळख आहे म्हणून पळशी ता. माण येथील सहा युवकांना २२ लाख ४० हजार रुपयेचा गंडा घालणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दोडी येथील सुदर्शन म्हालु उगले यांचे विरोधात संजय दामू करे यांनी म्हसवड पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असुन म्हसवड पोलिस तपास करत आहे.
 याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी, पळशी या माण जि. सातारा येथील संजय दामू करे वय ४५ हे दिनांक २०/११/२०१४ रोजी आपली पत्नी सरपंच वैशाली हिला पळशी ग्रामपंचायत कार्यालयात होते. त्यावेळी त्यांची ओळख सुदर्शन म्हालू उगले मु.थोडी पो. नांदूर शिंगोटे ता. सिन्नर जिल्हा नाशिक यांचेही ओळख झाली. त्यावेळी सुदर्शन उगले यांनी माझी पणन विभागात ओळख आहे. तिथे तीन लाख दर चालला आहे असे सांगितले असता संजय कारे यांनी मित्राकडुन व हात उसने घेऊन ४ लाख जमा केले त्यावेळी उगले यांनी त्यांना  तीन जागा देण्याचे कबुल केले. त्यानंतर त्यांना ३ लाख रुपये पुन्हा रोख स्वरुपात दिले उर्वरीत २ लाख रुपये त्यांचा भाचा दादा भाऊजी गोरड यांच्या दहिवडी येथील एसबीआय या बँकेच्या खात्यातुन ट्रान्फर केले असे एकूण त्यांच्या कडून नोकरीला लावतो म्हणून ९ लाख रुपये घेतले परंतु नोकरीला लावले नाही त्याने माझी फसवणुक केली.
त्याच प्रमाणे पळशी गावातील भगवान संभु पाटोळे वय ६३ यांच्या मुलास नोकरी लावतो म्हणून रोख २ लाख ४० हजार दिले व बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदूर शिंगोटे यांच्या खाते नंबर ६००५१५६६६०४ वर दिनांक २२/१२/२०१४ रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा गोंदावले ब्रु. शाखेतुन धनाजी शिवाजी जाधव यांच्या सहीने ट्रान्सफर केले. त्यानंतर काही दिवसांनी समजले की धनाजी शिवाजी जाधव यांच्या  भावाला हि पणन विभागात  नोकरी लावतो  म्हणून धनाजी जाधव कडुन रोख २ लाख ५० हजार व ५ लाख ५० हजार बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदूर शिंगोटे या शाखेतील खाते नंबर ६००५१५६६६०४ वर बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा गोंदावले ब्रु. असे एकूण ८ लाख रुपये नोकरी लावतो म्हणून घेतले व नोकरी न लावताच त्याने सर्वांची फसवणुक केली आहे.
  तक्रारदार संजय दामू करे यांचे ३ जण नोकरी लावतो म्हणून ९ लाख, भगवान संभु पाटोळे यांचा १ जण नोकरीस लावतो म्हणून ५ लाख ४० हजार तर धनाजी शिवाजी जाधव यांचे २ उमेदवार नोकरी लावतो म्हणून ८ लाख घेतले या तिघांना हि महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागात ६ सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून २२ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणुक केली असल्याची फिर्याद पळशी गावच्या सरपंच वैशाली करे यांचे पती संजय करे यांनी म्हसवड पोलिसांत दिली असुन म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि गणेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार खाडे तपास करत आहेत.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.


Post a Comment

0 Comments