आटपाडीत रोडरोमियोवर पोलिसांची कारवाई ; रोडरोमियोवर पोलिसात गुन्हा दाखल ; न्यायालयाने केला दंड ; विद्यार्थी व पालकांमधून समाधान  


आटपाडीत रोडरोमियोवर पोलिसांची कारवाई
पोलिसात गुन्हा दाखल ; न्यायालयाने केला दंड ; विद्यार्थी व पालकांमधून समाधान  
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीतील महाविद्यालयाच्या मैदानावर आरडा ओरडा करणाऱ्या रोडरोमिओला १५००  रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. कौठुळी येथील प्रथमेश अर्जुन टिंगरे हा मोटरसायकलवरून आटपाडी महाविद्यालयाच्या मैदानावर  आरडाओरडा करीत होता. रोडरोमियो बुलेट मोटरसायकल वरून टिबल सीट हिंडत असल्याने त्यामुळे आटपाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी रोडरोमिओला पकडून बुलेट ताब्यात घेऊन त्यास पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई केली. पोलीस अधिनियम कलम ११०, ११२, ११७, प्रमाणे कारवाई केली. त्याच्यावर खटला दाखल करून आटपाडी न्यायालयात पाठविण्यात आले असता न्यायालयाने रोडरोमिओला 1500 रुपये दंड केला. 
आटपाडी शहरात शाळा व कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थिनी मुलींना सातत्याने छेडछाडी करण्याचे प्रकार आटपाडी शहरात वाढल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी मोहिम हाती घेतली आहे. कॉलेज परिसर व रस्त्यावर लक्ष ठेवून रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी फिरत आहेत पोलिसांनी तिसर्याघ दिवशी सकाळी पुन्हा एका युवकास पकडून त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आटपाडी शहरात पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस बडगाची कारवाई कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता सुरू केल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 
आटपाडी पोलिसांनी दहावी व बारावीच्या परीक्षा काळात बंदोबस्त करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केल्यामुळे कॉलेज समोरील रस्त्यावर दिवसभर टवाळकी करणारे युवक व शहरातून भरधाव वेगाने फिरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई मोहीम हाती घेतली. त्यामुळे आटपाडी शहरातील बिघडलेली शिस्त आता लवकरच वळण लागेल अशी अशा सर्वांना वाटू लागली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाई बद्दल पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहेत.


आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस च्या whatasapp Grupp मध्ये Free Join होण्यासाठी क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured