वाशीमच्या अडकलेल्या कुटुंबाला निंबवडेकरांची मदत ; किराणा मालाचे कीट देवून केले सहकार्य ; न्यू माणदेशी फौंडेशनच्या सदस्यांची सामाजिक बांधलकी

वाशीमच्या अडकलेल्या कुटुंबाला निंबवडेकरांची मदत ; किराणा मालाचे कीट देवून केले सहकार्य ; न्यू माणदेशी फौंडेशनच्या सदस्यांची सामाजिक बांधलकी


वाशीमच्या अडकलेल्या कुटुंबाला निंबवडेकरांची मदत 
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी :  निंबवडे ता. आटपाडी, जि.सांगली येथे गावच्या ओढ्यावर बंधाऱ्याच्या बांधकामासाठी ठेकेदाराने वाशीम येथील 9 कुटुंब रोजगारासाठी आणलेली आहेत. ती निंबवडे गावच्या ओढा पात्रात वास्तव्यास असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यात दळणवळण बंद असल्याने ती गावी जावू शकत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होवू लागल्याचे पत्रकार व समाजसेवक राघव मेटकरी यांनी न्यू माणदेश युथ फाउंडेशन च्या सदस्यांना सांगितली. त्यावेळी फौंडेशनच्या वतीने सर्व सदस्यांनी त्यांना मदत करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला. याकामी तातडीची मदत म्हणून या कुटुंबियांना गावचे माजी मुख्याध्यापक डी.टी. मोटे यांच्या वतीने सर्व कुटुंबियांना किराणा मालाचे किट देण्यात आले. यावेळी त्यांचे सुपुत्र दत्तात्रय मोटे,  शिक्षक जयंत देठे, उपसरपंच सुरेश बुधावले,  पोलिस पाटील प्रविण मंडले, कार्याध्यक्ष नानासाहेब झुरे, संघटक मुकेश देठे, पत्रकार राघव मेटकरी, सरताज तांबोळी, नामदेवशेठ मोटे, कुमार माने या सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळत त्या कुटुंबाला मदत केली.  गावातील गरजू व्यक्तींना न्यू माणदेश युथ फाउंडेशन च्या माध्यमातून यानंतर ही मदत करण्यात येईल. सगळं जग या संकटात सापडल असताना लोकांनी धीराने सामोरे जावं एकमेकांना मदत करून आलेल्या परिस्थितीला सामोरे जावं. प्रशासनाला सहकार्य करावे. 
दिलीप मोटे 
अध्यक्ष 
 न्यू माणदेश युथ फौंडेशन,निंबवडे


 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments