दिवसभर कर्तव्य करून पोलीस पाटलांच्या काठीला विसावा..........


दिवसभर कर्तव्य करून पोलीस पाटलांच्या काठीला विसावा..........
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : कोरोना व्हायरसची  ची झळा ग्रामीण भागात पोहचल्याने गावाचा सैनिक म्हणून पहिल्या  दिवसांपासून पोलीस पाटील अख्या महाराष्ट्राभर रणांगणात उतरला. त्यातच सोलापूर  जिल्ह्यातील माळशिरस  तालुक्यातील भांबुर्डीचे पोलीस पाटील  रावसाहेब वाघमोडे सह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील  हे कोरोना सुरू झाल्यापासून आजपर्यंत कर्तव्य  करताना दिसुन येतात. अगदी तुटपुंजी मानधन असताना देखील तक्रार न करता केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाढवलेल्या मनोबलामुळे शासनाच्या सर्व आदेशाचे तंतोतंत पालण करताना  दिसुन येत आहेत.
 सकाळी उठले की आधी गावात गाडी घेऊन यायची, प्रत्येक किराणा दुकान, भाजीपाला विक्री करणाऱ्या ठिकाणी, रेशनच दुकान, मंदिर  या ठिकाणी सोशल डिस्टंन्स पाळतात की नाही, गावात कोण नविन येते, याबाबत दक्षात घेऊन प्रशासनापर्यत माहिती  पोहच करणे, गावात मोकाट फिरणाऱ्यावर हातात काठी घेऊन सुचनेच पालन करण्याचा सल्ला देणे, हे काम दिवसभर करत असताना कधी गावातील या चौकात तर कधी त्या चौकात पाटील रात्रीपर्यंत दिसतात. संध्याकाळी या पाटलांची काठी वेशीसमोर एका मोकळ्या खुर्चीशेजारी दिसली अन् पाटलांची काठी विसावा घेतल्याची भावाना निर्माण झाली. 
संध्याकाळी नेहेमी प्रमाणे गावातील मुख्य चौकात आलो असता, वेशीसमोर पाटलांची खुर्ची अन् काठी दिसली. खरं तर या ठिकाणी सध्याकाळी पत्रकार एल.डी. वाघमोडे  व मी काही चर्चा करण्यासाठी  थोडा वेळ बसत असतो. पण पाटलाची खुर्ची अन् काठी दिसली म्हणून त्या खुर्चीवर बसण्याची हिंमत झाली नाही, अन् फोटो काढून चांगल्या कार्याला चांगलं म्हणण्याची सवय म्हणून या पाटलांविषयी थोडसं उतरायी व्हाव म्हणून लिहले...
धावपळीच्या जगात, सततच्या दगदगीत, रोजच्या कामात, थोडा विसावा मिळेल काय....?  स्वतःचे दुःख विसरताना, दुसऱ्यांची मने जपताना, हवे नको ते बघताना, थोडा विसावा मिळेल काय...? दुसऱ्यांना सावरताना, स्वतःन डगमगताना, खंबीरपणे उभे राहताना, थोडा विसावा मिळेल काय...? स्वतःच्या इच्छा विसरताना थोडेसे अश्रू ढाळताना, इतरांना थोडे हसवताना, थोडा विसावा पाटलांच्या काठीला मिळेल काय..? पाटलांच्या काठीला मिळेल काय...?


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured