झरे येथे माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या टीमकडून नागरिकांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप 


झरे येथे माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या टीमकडून नागरिकांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आज दि. २४ रोजी आटपाडी पश्चिम भागातील झरे परिसरात माजी आमदार अॅड सदाशिवरावभाऊ पाटील प्रतिष्ठान च्या वतीने व विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील यांच्या सहकार्याने व कै.चंद्रकांत राजमाने यांचे स्मरणार्थ सचिन राजमाने यांचेकडून झरे परिसरातील गोर, गरीब नागरिकांना जीवनाश्यक कीट असणाऱ्या साहित्याचे वाटप युवा नेते विशाल पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी विशाल पाटील,  श्री. देवकर,  प्रा.एन..पी.खरजे, हिंदूरावशेठ थोरात, विटा अर्बन संचालक सचिन राजमाने, श्री. डोंगरे, धनंजय वाघमारे, आप्पाशेठ थोरात, विजय अनुसे, संतोष सादिगले, नितीन कारंडे, शैलेश आंदळकर, प्रफुल्ल झाडे, सुखदेव खताळ, वैभव पावणे, विलास खरजे, आण्णासाहेब मोटे, सतिश सादिगले, महेश कातुरे, गणेश आंदळकर, मयुर आंदळकर, विजय पाटील व सर्व विटा अर्बन शाखा झरे चे सर्व पदाधिकारी आणि वैभवदादा पाटील युवा मंच सांगली चे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनीं उपस्थित होते.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉककडाऊन परिस्थितीत पुन्हा एकदा माजी आमदार ॲड. सदाशिवरावभाऊ पाटील व त्यांच्या सहकार्याने माणुसकीचे दर्शन घडविले. सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम करणारे हे प्रतिष्ठान जनतेच्या सुखा दुःखात कायमच सक्रियपणे सहभाग घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल जनतेमधून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. सदरच्या जीवनाश्यक वस्तूचे वाटप चे झरेचे युवा नेते धनंजय वाघमारे यांनी सुचविल्याप्रमाणे करण्यात आले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured