राज्यस्तरीय मंथन परीक्षेत अजनाळेच्या अभिनव पब्लिक स्कूलचे यश


राज्यस्तरीय मंथन परीक्षेत अजनाळेच्या अभिनव पब्लिक स्कूलचे यश
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन परीक्षेत अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे ता. सांगोला, जि.सोलापूर या स्कूलने घवघवीत यश संपादन करून उज्वल यशाची परंपरा कायम राखली.  यामध्ये इ. १ ली तील  कु.गणेश संतोष येलपले याने १५० पैकी १२४ गुण मिळवत राज्यात १४ वा , जिल्ह्यात १४ वा व  केंद्रात १ ला क्रमांक मिळविला. कु.ऐश्वर्या ज्ञानेश्वर पांढरे हिने इयता पहिलीमध्ये १५० पैकी ११० गुण मिळवित राज्यात २१ वी, जिल्ह्यात २१ वी, तर केंद्रात २ री आली.  इ. ३ री तील कु. अनिकेत अर्जुन कोळवले हिने ३०० पैकी २६८ गुण मिळवून राज्यात १७ वा, जिल्ह्यात १५ वा तर केंद्रात ५ वा क्रमांक मिळविला. 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष शिवाजी लाडे, मुख्याध्यापिका  कावेरी गिड्डे तसेच सर्व शिक्षक, पालक  यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured