माळशिरस पोलिसांनी बनावट रुग्णाची वाहतूक करणारी रुग्णवाहिका घेतली ताब्यात

माळशिरस पोलिसांनी बनावट रुग्णाची वाहतूक करणारी रुग्णवाहिका घेतली ताब्यात


माळशिरस पोलिसांनी बनावट रुग्णाची वाहतूक करणारी रुग्णवाहिका घेतली ताब्यात
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : दिवा लावलेली अॅब्युलन्स, सायरनचा आवाज कानी पडताच इतर वाहनधारक आपली वाहने  बाजुला घेवून अॅब्युलन्स वाट मोकळी करून देतात. पोलिसही अशा वाहनाला अडथळा निर्माण करीत नाहीत. मात्र सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात अशा खाजगी रुग्णवाहिकेचे मधून वेगळाच प्रकार समोर आला. माळशिरस पोलिसांनी रुग्णवाहिका चौकशीसाठी थांबवताच चक्क रुग्ण ऊठून पळायला लागली. पोलिसांनी रूग्णवाहिका सह चालक राजाराम खंडु जाधव याला ताब्यात घेण्यात आले. असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीत येथे वास्तव्यास असणाऱ्या राजाराम जाधव हे मारुती व्हॅन ओमिनी एम.एच ४२ ए क्यु १६७७  या रुग्णवाहिकेचे मधून तीन इसमांना माळशिरस येथून बारामती कडे चालले होते. माळशिरस पोलिसांना संशय आल्यामुळे रुग्णवाहिका चौकशीसाठी थांबवण्यात आली व  चौकशी सुरू असतानाच बनावट रुग्णाचे सोंग घेतलेला रुग्ण गाडीतून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी या गाडीत बाबासाहेब शेलार, अनिता शेलार, गौरव शेलार हे तिघे रा. बारामती जि पुणे येथील व्यक्ती आढळून आल्या. यांनी आजारी असल्याचा बनाव केल्याचे निदर्शनास आले. सदर परिस्थितीचा पंचनामा करून चालक राजाराम खंडू जाधव वय ४५ बारामती यांच्यावर भादवि कलम २६९ , १८८ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५  चे कलम ५१ ब  कलमान्वये सरकार तर्फे  नगरपंचायत मुख्य अधिकारी डॉ विश्वनाथ वडजे यांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी रुग्णवाहिका व चालकाला ताब्यात घेतले असून याचा अधिक तपास पो.नि विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश गायकवाड,सचिन डुबल, युनुस आतार, अमोल बकाल सह पोलीस पथक करीत आहे.
धोका कायमच
जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत वाढ होवू लागली आहे.  माळशिरस तालुका हा सातारा, सांगली,पुणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मोडत आहे. त्यामुळे पायी चालत अथवा इतर आडमार्गाने बाहेर असलेल्या लोकांची आवक सुरू आहे. याशिवाय अशी फसवणूक करूनही लोक ये-जा करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू पसरण्याचा धोका तालुक्याला कायम आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a comment

0 Comments