म्हसवड नगरपरिषदेने उभारला सॉनिटाझर रूम बॉक्स ; आरोग्य निरिक्षक सागर सरतापे यांचा उपक्रम 

म्हसवड नगरपरिषदेने उभारला सॉनिटाझर रूम बॉक्स ; आरोग्य निरिक्षक सागर सरतापे यांचा उपक्रम 


म्हसवड नगरपरिषदेने उभारला सॉनिटाझर रूम बॉक्स ; आरोग्य निरिक्षक सागर सरतापे यांचा उपक्रम 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड नगरपरिषद मार्फत करोना व्हायरस (कोव्हेड19) या संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी म्हसवड नगरपरिषदेचे आरोग्य निरिक्षक सागर सरतापे यांनी आगळा वेगळा उपक्रम राबविलेला आहे तो म्हणजे कमी खर्चात हात धुण्यासाठी योजना केलेली आहे. ती म्हणजे नळाला  हात न लावता पायाने पायंडल दाबून पाणी हातावर येत आहे व हातावरती हात धुण्याचे लिक्विड (हॅन्ड वॉश) घेणे आणि टाकाऊ पासुन टिकाऊ या  धोरणातून  नवोउपक्रम राबविला आहे. तो म्हणजे नागरिकांच्या अंगावरती फवारणी करणेसाठी सॉनिटाझर झोन उभारण्यात आला आहे. त्याकरिता कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात आलेला नाही. त्यामध्ये बसविण्यात आलेले स्पिंकलर हे सायपन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे लाईट बील भरावे लागत नाही. स्वच्छ सर्व्हेक्षणचे फ्लेक्स बोर्ड उभारून सॉनिटाझर झोन उभारण्यात आला आहे तरी या सॉनिटाझर झोन चा उपयोग नागरिकांसाठी निर्जंतुकीकरण करुन घेणे हा असल्याचे मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे, नगराअध्यक्ष भगतसिंग विरकर, उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी म्हणाल्या. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free

Post a comment

0 Comments