मास्क वापरण्याचा आदेश असून सुद्धा न वापरणाऱ्यांना आटपाडी पोलिसांचा दणका  ;  आटपाडीसह तालुक्यातील १५ जणांना प्रत्येकी ४००० रुपयांचा दंड

मास्क वापरण्याचा आदेश असून सुद्धा न वापरणाऱ्यांना आटपाडी पोलिसांचा दणका  ;  आटपाडीसह तालुक्यातील १५ जणांना प्रत्येकी ४००० रुपयांचा दंड


मास्क वापरण्याचा आदेश असून सुद्धा न वापरणाऱ्यांना आटपाडी पोलिसांचा दणका  ;  आटपाडीसह तालुक्यातील १५ जणांना प्रत्येकी ४००० रुपयांचा दंड
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असूनही मास्क न घालता मोकाट फिरणाऱ्यांना आटपाडी, करगणी, दिघंची, झरे येथील अनुक्रमे १) लखन ब्रह्मदेव यादव वय २१ वर्षे रा. सोमेश्वर नगर आटपाडी, २) सागर बबन कोळेकर वय ३० वर्षे रा. कोळेकरमळा आटपाडी. ३) महेश अर्जुन पाटील वय ३२ वर्षे रा. काळामळा आटपाडी, ४) विजय प्रवीण चव्हाण वय ४० वर्षे रा. प्रकाशवाडी आटपाडी, ५) प्रवीण दिलीप साळुंखे वय ३२ वर्षे रा. देशमुखगल्ली आटपाडी, ६) नंदकुमार अंबादास भिवरे वय ५२ वर्षे रा. भवानीनगर आटपाडी, ७) नाथा निवृत्ती पुसावळे वय ४५ वर्षे रा. दिघंची ८) सलिम मोतीलाल जमादार वय ५५ वर्षे रा. दिघंची, ९) रंगनाथ गणू माळवे वय ४२ वर्षे रा. झरे १०) राजेंद्र तुळशीराम बदडे वय ४४ वर्षे रा. झरे, ११) अरबाज आदम शेख वय २४ वर्षे रा. भिंगेवाडी, १२) आसिफ रमजान खाटीक वय ३६ वर्षे रा. आटपाडी १३) दादा शंकर सरगर वय ५९ वर्षे रा. करगणी, १४) किसन बयाजी सरगर वय ५५ वर्षे रा. करगणी १५) आकाश दादासाहेब जाधव वय १९ वर्षे रा. वलवण ता. आटपाडी जि.,सांगली यांचेकडून प्रत्येकी ४००० प्रमाणे दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आटपाडी पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई आटपाडी पो. ठाणेचेपोलीस निरीक्षक बी.ए.कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आटपाडी पोलीस प्रशासनाकडुन नागरीकांना कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आलेले आहे. पुकारुन सांगण्यात आलेले आहे. नागरीकांनी विनाकारण घरा बाहेर पडु नये घरातच थांबावे, कोरोनाचे संकट गडद असताना सुद्धा सुज्ञ नागरीक प्रशासनाने दिलेल्या सुचानांकडे दुर्लक्ष करुन सुचनांना केराची टोपली दाखवत आहे. अशा नागरीकांना, हुल्लडबाजांना ताब्यात घेऊन त्यांचेवर आणखीन कडक व मजबुत कारवाई करण्यात येण्यार असल्याचे पोलीस निरीक्षक बी.ए. कांबळे यांनी सांगीतले आहे व तशा सुचना अधिकारी व कर्मचारी यांना दिलेल्या आहेत.


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


 


Post a comment

0 Comments