रामचंद्र साळुंखे यांनी एक महिन्याचा पगार दिला  मुख्यमंत्री सहायता निधीस ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून कौतुक


रामचंद्र साळुंखे यांनी एक महिन्याचा पगार दिला  मुख्यमंत्री सहायता निधीस ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून कौतुक
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे शिपाई पदावर कार्यरत असणारे रामचंद्र गोपाळ साळुंखे यांनी कोविड-19 साठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपला एक महिन्याचा पगार रुपये 28 हजार 473 चा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचेकडे सुपुर्द केला. 
कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपुर्ण जगभर थैमान घातले आहे. देशातही याचा प्रादुर्भाव वाढत आहे. सदर आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. या आपत्तीतून सावरण्यासाठी आपलाही हातभार असवा या जाणीवेतून रामचंद्र साळुंखे यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला आहे. श्री साळुंखे यांनी केलेली मदत ही अत्यंत मोलाची असून त्यांच्या संवेदनशिलतेबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured