दानशूरांनी मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय मदतस्विकृती केंद्राशी संपर्क साधावा

दानशूरांनी मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय मदतस्विकृती केंद्राशी संपर्क साधावा


दानशूरांनी मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय मदतस्विकृती केंद्राशी संपर्क साधावा
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  कोरोना विषाणूचा या जागतिक साथरोगाच्या संकटामुळे अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊसतोड मजूर, भटके लोक इत्यादी यांना कायमस्वरुपी राहणेची तसेच खाणे-पिणेची सोय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी ते सध्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आसरा देण्यासाठी निवारागृहे स्थापन करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार आणखी निवारागृहे स्थापन करण्यात येत आहेत. ज्यांना निवारागृहामध्ये आश्रय घेणेचा आहे त्यांनी संबधित तालुका नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. तालुका नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत- तालुका नियंत्रण कक्ष मिरज – 0233-2222682, तालुका नियंत्रण कक्ष शिराळा – 02345-272127, तालुका नियंत्रण कक्ष वाळवा – 02342-222250, तालुका नियंत्रण कक्ष पलूस-02346-226888, तालुका नियंत्रण कक्ष कडेगाव – 02347-243122, तालुका नियंत्रण कक्ष तासगाव – 02346-250630, तालुका नियंत्रण कक्ष कवठेमहाकाळ – 02341-222039, तालुका नियंत्रण कक्ष खानापूर-0247-272626, तालुका नियंत्रण कक्ष अटपाडी – 02343-221624, तालुका नियंत्रण कक्ष जत – 02344-246234 असा आहे.  


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments