म्हसवड करांनो आता तरी घरी बसा !

म्हसवड करांनो आता तरी घरी बसा !


म्हसवड करांनो आता तरी घरी बसा !
पोलीसांनी जप्त केल्या १४० मोटारसायकली ; लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजेना 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : कोरोना संसर्गजन्य विषाणूचे गांभीर्य म्हसवडकरांना समजणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला. कारण संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना म्हसवडकर मात्र अजूनही अनभिज्ञ असल्यासारखेच वागत आहेत. त्यामुळे म्हसवड पोलिसांनी‌ लॉकडाऊनची धडक‌ कारवाई सुरु केली आहे. काल  सकाळपासुन दुपारी बारा पर्यंत तब्बल १४० मोटार सायकली त्यासोबतच चारचाकी वाहणे जप्त‌ करुन रस्त्यावर व गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्यावर फौजदारी खटले दाखल करण्याची प्रकिया चालू केली आहे.
१४ एप्रिल अखेर घरातून कोणीही बाहेर पडू नये असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन करुनही नागरिक बेशिस्त वर्तन करीत असल्यामुळे पोलिसांनी आक्रमकतेने वाहने जप्तीची कारवाई सुरु केलेली आहे. त्यामुळे आता तरी म्हसवडकर सुधारतील व कोरोनाला पळवून लावतील.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments