ऊसतोड कामगारांना हरिदास लेंगरेंचा मदतीचा हात


ऊसतोड कामगारांना हरिदास लेंगरेंचा मदतीचा हात


माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : महाराष्ट्रासह देशावरती कोरोना रोगाचं महाभयंकर संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या अनेक भागातील ऊसतोड मजूर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना कामगार नेते  हरीदार लेंगरे यांनी मदतीचा हात दिला.


हरिदास लेंगरे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मिरज  तहसीलदार  देसाई यांच्या बरोबर चर्चा  करून  कोल्हापूर मधल्या कामगारांसाठी राज्याचे मंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याशी फोनवरून संपर्क  करून पंचगंगा सहकारी साखर कारखानाच्या अग्रिकल्चर ऑफिस मध्ये कामगारांना गरजेच्या वस्तू कारखान्यातर्फे पोच करून सदर कामगारांना दिलासा दिला. तर उर्वरित महाराष्ट्रातून आलेल्या उसतोड कामगारांनी दूरध्वनीवरून हरिदास लेंगरे यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी सांगितल्या. याप्रकरणी कामगारांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या प्रशासनाची बोलून हरिदास लेंगरे यांनी अनेक कामगारांच्या अडचणी मार्गी लावल्या. त्याबद्दल कामगारांनी समाधान व्यक्त केले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured