Type Here to Get Search Results !

खेराडे वांगी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी ; माजी जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


खेराडे वांगी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी ; माजी जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/कुलभूषण महाजन : खेराडे वांगी ता. कडेगाव येथील मुंबई येथे मयत झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेक प्रश्नांना तोंड फुटले असून संचारबंदी असताना सदर मृतदेह कोणाच्या परवानगीने मुंबई येथून खेराडे वांगी येथे आणला. यासह महत्वपूर्ण सवाल करत माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. संग्रामसिंह देशमुख यांनी याबाबतचे निवेदन कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांना दिले आहे.
निवेदनात दिलेली माहिती अशी की, दि. १८ रोजी सायन हॉस्पिटल मुंबई येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर व्यक्तीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे मुंबई येथील सायन हॉस्पिटल प्रशासनाने मृत्यू प्रमाणात नमुद केले आहे. तथापि मृत पावलेल्या व्यक्तीचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. वास्तविक मृत्यू प्रमाणापत्रावर कोरोना संशयित व्यक्ती अथवा कोरोना रिपोर्ट पेंडीग असा उल्लेख करायला हवा होता. मात्र, तसे न झाल्यामुळे त्याच व्यक्तीचे अंत्यसंस्कार खेराडे वांगी येथे करण्यात आले. यानंतर दि. २२ रोजी सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल हॉस्पिटल प्रशासनाने सांगली जिल्हा प्रशासनाला कळविला. या संपूर्ण प्रकरणावर आक्षेप घेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. प्रोटोकॉल नुसार मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. परंतु रिपोर्ट समजने आधी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात का दिला. संचारबंदीमुळे मुंबई मध्ये अंत्यसंस्कार करणे आवश्यक असताना गावाकडे मृतदेह आणला कसा. ग्रामपंचायत खेराडे वांगी व ग्रामस्थांचा हा मृतदेह गावामध्ये आणण्यासाठी विरोध होता. तसेच जिल्हा बंदी असताना हा मृतदेह गावामध्ये आणला त्यावेळी स्थानिक प्रशासन काय करत होते. संपूर्ण महाराष्ट्रात लॉककडाऊन असताना मुंबई, पुणे, सातारा व सांगली जिल्ह्य़ाच्या सिमा ओलांडून मृतदेह खेराडे वांगी गावात कसा आला. त्यासाठी कोणत्या सक्षम प्राधिकाऱ्याने प्रवास परवाना दिला होता का? असल्यास त्यांनी सांगली जिल्हा अथवा स्थानिक प्रशासनास याबाबत सुचना दिली होती का. अंत्यसंस्कार करताना प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले का. जमाव बंदी असताना पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आले होते. याबाबत प्रशासनाने कोणतीही दक्षता का घेतली नाही. संपर्कात आलेल्या व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आलेचे समजते. परंतु संपूर्ण गामीण भागामध्ये लोक कटाक्षाने काळजी घेत असताना या प्रकारामुळे संपूर्ण गाव आणि तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचली तर त्या गलथानपणाला जबाबदार कोण. तरी सदर प्रकरणामध्ये सर्व सामान्य नागरीकांच्या आरोग्यास हलगर्जीपणाने धोका निर्माण करणाऱ्या दोषी व्यक्तींच्यावर कठोर कारवाई व्हावी असे या निवेदनात केली असून प्रांताधिकारी गणेश मारकड यांना देण्यात आले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies