मास्क न लावता मोकाट फिरणाऱ्या ५ जणांवर आटपाडी पोलिसांची कारवाई ; प्रत्येकी ५ हजाराचा न्यायालयाकडून दंड
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : विनाकारण तोंडाला मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या पाच जणांवर आटपाडी पोलिसांनी कारवाई केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता प्रत्येक व्यक्तीस पाच हजार रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. तोंडाला मास्क न लावता फिरत असताना सोमनाथ दत्तात्रय पावले, नदीम युनुस खाटीक, संदीप राजाराम जाधव, ज्ञानेश हरिबा पांढरे, रघुनाथ शिवाजी यादव यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज