ई-फायलिंग सुनावणी च्या माध्यमातून झाला अटकपूर्व जमीन मंजूर ; ॲड अनंत वडगावकर यांनी मांडला आरोपीच्या वतीने युक्तिवाद 

ई-फायलिंग सुनावणी च्या माध्यमातून झाला अटकपूर्व जमीन मंजूर ; ॲड अनंत वडगावकर यांनी मांडला आरोपीच्या वतीने युक्तिवाद 


ई-फायलिंग सुनावणी च्या माध्यमातून झाला अटकपूर्व जमीन मंजूर ; ॲड अनंत वडगावकर यांनी मांडला आरोपीच्या वतीने युक्तिवाद 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : देशभर कोरोना जाळे पसरत असून आपल्या घरी रहा सुरक्षित रहा असा सरकारने आदेश काढला असून जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सुद्धा बंद आहे. मात्र महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी नमूद केलेल्या तारखेला घेतली जात आहे. सोलापूरचे मनोहर माशाळ यांच्याविरोधात सावकारी नियंत्रण कायदा सलगर वस्ती पोलिस स्टेशन मध्ये सावकारी नियंत्रण कायदा खाली गुन्हा नोंद करण्यात आला होता. दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने ॲड अनंत वडगावकर यांचेमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. लॉकडाऊन मुळे उच्च न्यायालय पर्यंत पोहचण्याची गैरसोय होत असल्याने कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता उच्च न्यायालयाने ई-फायलिंग सुनावणी पर्याय उपलब्ध करून दिल्याने 9 एप्रिल रोजी झालेल्या ई सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने ॲड अनंत वडगावकर यांचा युक्तीवाद ऐकून घेऊन आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. ई सुनावणी च्या माध्यमातून झालेला हा पहिला अटकपूर्व जामीन आहे. ई सुनावणीचे वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयाचे नियम पाळून ई सुनावणी सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली होती. ई सुनावणीचेच्या माध्यमातून न्याय सुलभ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. अटकपूर्व जामीन साठी ॲड अनंत वडगावकर, उच्च न्यायालय मुंबई व विनोद सुरवसे यांनी बाजू मांडली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments