सावधान I जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह 

सावधान I जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह 


सावधान I जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव या गावातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.
जत तालुक्यातील हा पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्याचे मुळ गाव अंकले असून तो मुंबई येथे कामाला आहे. टप प्रथम चेंबूर मधून माल वाहतूक ट्रकमधून नागजफाटा येथे आल्याचे समोर आले आहे. तेथून तो अंकलेपर्यत बुधवारी पहाटे चालत आले होते. तेथील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अंकले जिल्हा परिषद शाळेत त्यांना क्वारंटाईन केले होते.
डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे यांच्या पथकाने बुधवारी रात्री त्याची तपासणी केली होती.त्यात एकाची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्याला मिरजला हलविले होते.तेथे त्यांच्या स्वाबची तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्याने ज्या ज्या वाहनातून प्रवास केला त्या चालकांचे शोध सुरू आहेत. त्याशिवाय ते अन्य कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत. याची तपासणी केली जात आहे.


गाव, शहर ते देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेगवान घडामोडी साठी आजच जॉईन करा माणदेश एक्सप्रेस whatasapp


 


गाव, शहर ते देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या वेगवान घडामोडी साठी आजच जॉईन करा  माणदेश एक्सप्रेस Telegram


 


Post a Comment

0 Comments