या साखर कारखान्याचे माजी अध्यक्षासह १६ जण जुगार खेळताना सापडले 

या साखर कारखान्याचे माजी अध्यक्षासह १६ जण जुगार खेळताना सापडले 


या साखर कारखान्याचे माजी अध्यक्षासह १६ जण जुगार खेळताना सापडले 
माणदेश एक्स्प्रेस न्युज
मंगळवेढां : मंगळवेढा पोलिसांनी डोणज येथे टाकलेल्या धाडीत दामाजी कारखान्याच्या माजी अध्यक्षासह 16 जण जुगार खेळताना पोलिसांना सापडले असून त्यांच्याकडून 3 लाख 51 हजार 680 चा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून याबाबतची फिर्याद पोकॉ. अजित मिसाळ यांनी दिली आहे. 
डोणज शिवारातील महादेव कोरे यांच्या शेतातील झाडाखाली एकत्रित बसून दोन गटात तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मंगळवेढा पोलिसांना मिळाली त्यानुसार पथक तयार करून या पथकाने टाकलेल्या धाडीत दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष शशिकांत बुगडे, राजेंद्र कट्टीमणी, गौसपाक नदाफ, काशिनाथ लिगाडे, सोमन्ना संपागे, भीमाशंकर सुतार, आण्णाराया दसाडे, मलकारी पुजारी, शिवानंद इंगळेश्वर, शिवानंद आनंदपुरे, राजू मुलानी, सदाशिव कोळी, विष्णू संपागे, देवाप्पा बिराजदार, विजय कोळी हे जुगार खेळताना सापडले असून त्यांच्याकडे रोख रक्कम, विविध कंपनीचे मोबाईल व दुचाकी असा 3 लाख 51 हजार 680 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.याबाबत मंगळवेढा पोलीस ठाणेत  भा.दं.वि.सं. कलम १८८, २६९, २७०.  आपत्ती व्यवस्थापन कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (३), १३५ साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम कलम २, ३, ४, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची घटना ही दि. ३० एप्रिल २०२० रोजी घडली.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments