Type Here to Get Search Results !

सांगलीतील खुनाचा गुन्हा उघडकीस ; पुर्व वैमन्यस्यातून खून केल्याची आरोपींची कबुली 


सांगलीतील खुनाचा गुन्हा उघडकीस ; पुर्व वैमन्यस्यातून खून केल्याची आरोपींची कबुली 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  सांगली येथील कृष्णा नदीमध्ये खून करून मृतदेह पोत्यात भरून टाकला होता. त्या खुनाचा तपास करत अवघ्या ६ तासांत पोलिसांनी २ मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. १) 1) शिवाजी ज्ञानदेव शिंगे (वय-40 वर्ष,धंदा-मजुरी सध्या रा. बाळुमामा मंदीर जवळ सांगलीवाडी, मुळ गाव- सातलगी ता. इंडी जि.विजापुर) 2) हणमंत सिद्धाप्पा पुजारी (वय-35 वर्ष, धंदा-मजुरी सध्या रा.बाळुमामा मंदीर जवळ सांगलीवाडी, मुळ गाव-ककमरी ता.अथणी जि.बेळगाव)  अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून या दोघांनी मिळुन पुर्व वैमन्यस्यातून हा खून केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे.
सांगली शहर पोलीस ठाणेस निनावी फोनद्वारे माहीती मिळाली की,कृष्णा नदी पात्रात जुना बंधारा याठिकाणी एक पोते वाहत आले असुन त्याच्यावरती रक्ता सारखे डाग दिसत आहेत, आणि आजु बाजुच्या परिसरात दुर्गधी पसरलेली आहे.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पोलीस स्टाफला आदेश दिली आणि खात्री करणेकामी घटनास्थळी पाठविले. या पोत्याच्या आतमध्ये मृतदेह आहे. यावरुन पोलीस स्टाफ व जीवरक्षक टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह हा पुरुष जातीचा असुन अंदाजे वय 40 ते 45 चे दरम्यान होता.गळ्यावरती जखमेच्या खुना दिसत होत्या आणि पोत्याचे आतमध्ये एक मोठा दगड मिळुन आला.मृत्तदेहाच्या वर्णनावरुन मयत इसमाचा खुन करण्यात आल्याचे व पुरावा नष्ट करणेच्या उद्देशाने मृतदेह हा पोत्यात घालून त्यामध्ये जास्त वजनाचा दगड बाधुन ठेवण्यात आलेला आहे. या क्लिष्ट गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांच्या आदेशाने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अशोक विरकर यांचे मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी एक खास पथक तयार केले. गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले, त्याप्रमाणे तपास करित असताना सांगलीवाडी येथुन शिवाप्पा बसाप्पा केळगडे हा सुमारे 4 दिवसापासून अचानक मिसींग असलेबाबत समजले. त्यानंतर सदर इसमाच्या घरी जात पोलीसांनी अधिक माहीती घेत त्याचे नातेवाईकांना मयत इसमाचे वर्णन व फोटो दाखवुन खात्री केली केली. मयत व्यक्ती ही तीच असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी यांचेकडे अधिक तपास करित असताना पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना त्यांच्या खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, मयत शिवाप्पा केळगडेचे मित्र शिवाजी ज्ञानदेव शिंगे व  हणमंत सिद्धाप्पा पुजारी या दोघांनी मिळून हा खून केला असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी सपोनि निलेश बागाव आणि डीबी पथकाला संशयीत आरोपींचा शोध घेवून तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी सपोनि निलेश बागाव, डीबी शाखेकडील कर्मचारी यांनी  आरोपींना जुना समडोळी रोड येथील एका निर्जन वस्तीच्या शेतात लपुन बसले ठिकाणाहुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून हा गुन्हा  वैमन्यस्यातून केला असल्याची कबुली त्यांनी पोलीस पथकाला दिली आहे. गुन्हा सांगली शहर पोलीस ठाणेस भाग -5 गु. र.नं. 155/2020 भा.द.वि.स कलम-302,201,34 अन्वये दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश बागाव, पोहेकॉ/1626 दिलीप जाधव, पोहेकॉ/1154 उदय कुलकर्णी, पोहेकॉ/343 शिवलींग मगदुम,पोहेकॉ/1398 दिनकर चव्हाण,पोना/440 संदीप पाटील, पोना/776 शेजाळ, पोना/384 निलेश गोंदके, पोना/1251 धनाजी शिंदे, पोना/216 अभिजीत फडतरे पोशि/2247 गणेश कांबळे, पोशि/1068 महेश बन्ने पोशि/2166 दिपक कांबळे, पोशि/2360 विक्रम खोत यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि निलेश बागाव हे करित आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies