चर्चेला पूर्णविराम. आटपाडी शहरातील सर्व दुकाने राहणार चालू 

चर्चेला पूर्णविराम. आटपाडी शहरातील सर्व दुकाने राहणार चालू 


चर्चेला पूर्णविराम. आटपाडी शहरातील सर्व दुकाने राहणार चालू 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी :  कोरोना या संसर्गजन्य विषाणुची संसर्ग साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय जिल्हास्तरावर घेतला. परंतु यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या ठिकाणी लॉकडाऊन तर ग्रामीण भागात जनता कर्फ्यू असा निर्णय घेतला गेल्याने आटपाडीतील नागरिकांची व व्यापाऱ्यांची संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
परंतु आता सर्व चर्चा यांना पूर्णविराम मिळाला आहे. आटपाडी शहरातील सर्व दुकाने चालू राहणार असल्याचे ग्राम आपत्ती व्यवस्थापन समितीने ध्वनीक्षेपावरून शहरातून सांगितले. 
आटपाडी हे मोठे लोकसंख्येचे शहर आहे. परंतु केवळ ग्रामपंचायत आहे या तांत्रिक अडचणीमूळे आटपाडी शहरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करायला हवे होते. परंतु महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत येथे लॉकडाऊन व ग्रामीण भागात जनता कर्फ्यू असा असल्याने आटपाडी भाग ग्रामीण असल्याने आटपाडीमध्ये जनता कर्फ्यू राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशानुसार पूर्वीचाच आदेश कायम असल्याने शहरातील सावर दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू राहणार आहेत. 
फोटो लोगो आहे 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


 


Post a Comment

0 Comments