'आम्ही नियम मोडण्यासाठीच आलोय' : प्रकाश आंबेडकर


 


'आम्ही नियम मोडण्यासाठीच आलोय' : प्रकाश आंबेडकरपंढरपूर : आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय. मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरं खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे, कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच,असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आता त्यांची वाट पाहात आहे. त्यांचा निरोप काय येतो ते पाहू, त्यानंतर मी विठ्ठल मंदिरात जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.मागच्या वर्षी जितकी लोकं पंढरपुरात मृत्यूमुखी पडली त्यापेक्षा कमी लोकं यंदा मृत झाली आहेत, त्यामुळं कोरोनाची भीती दाखवू नका, असंही त्यांनी सूचित केलं. यावेळी आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. बॅरिकेट्स तोडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, एकमेकांना चिटकून उभे राहू नका, असं आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी पोलिसांचं बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

Previous Post Next Post