राज्यातील मंदिरे होणार खुली ; आठ दिवसात नवीन नियमावली : मुख्यमंत्र्यांचे प्रकाश आंबेडकर यांना आश्वासन 


 


राज्यातील मंदिरे होणार खुली ; आठ दिवसात नवीन नियमावली : मुख्यमंत्र्यांचे प्रकाश आंबेडकर यांना आश्वासन पंढरपूर :  लवकरात लवकर लोकांसाठी मंदिर, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरु केली जातील. त्यासाठी सरकार नियमावली तयार केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.


 


 मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन घेतल्यावर समाप्त करण्यात आले.विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.


 ते म्हणाले की, मी दर्शन घेतलं. 15 जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आलं. मंदिरं खुली करण्याबाबत  मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आपण आठ दिवस थांबू, वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. लोकभावनेचा आदर केला त्याबद्दल सरकारचे आभार असेही ते म्हणाले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post