वैनगंगेला महापूर तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

वैनगंगेला महापूर तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा


वैनगंगेला महापूर तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराभंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका भंडारा जिल्ह्याला बसला आहे.


 


पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आले पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा शहरात नागपूर नाक्यावर 3 फुट पाणी जमा झालं आहे. यामुळं भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या संपर्क तुटला आहे.


 


26 हजार क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरु असल्याने गोसेखुर्द धरणाचे बॅक वॉटर भंडारा शहरातील नागपूर नाका (साई नाथ नगर )परिसरात घुसले असून भोजापूर नाल्यावरुन चार फुट पानी वाहत असल्याने भंडारा-नागपूर मार्ग बंद आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments