कोविड-19 : जिल्ह्यात 50 वर्षावरील कोमॉर्बिडिटी असलेल्या 5 लाखाहून अधिक नागरिकांचा सर्व्हे 

कोविड-19 : जिल्ह्यात 50 वर्षावरील कोमॉर्बिडिटी असलेल्या 5 लाखाहून अधिक नागरिकांचा सर्व्हे 


 


कोविड-19 : जिल्ह्यात 50 वर्षावरील कोमॉर्बिडिटी असलेल्या 5 लाखाहून अधिक नागरिकांचा सर्व्हे सांगली, दि. 29 : कोविड-19 बाधित रूग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात 50 वर्षावरील कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांचा सर्व्हे करण्यात येत असून आत्तापर्यंत 5 लाख 29 हजार 722 लोकांचा सर्व्हे करून 3 हजार 240 स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी 1 हजार 278 नागरिक पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी  म्हणाले, सांगली जिल्ह्यात दि. 28 ऑगस्ट अखेर कोरोना विषाणू संसर्गाचे 10 हजार 422 रूग्ण आढळून आले असून यापैकी 6 हजार 293 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 428 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 63 हजार 109 सॅम्पल्स घेण्यात आल्या असून गेल्या 7 दिवसात 8 हजार 101 सॅम्पल्स घेण्यात आल्या आहेत. पॉझिटीव्हीटी रेट 16.25 असून मृत्यू रेट 4.10, रिकव्हरी रेट 60.38 तर डब्लींग रेट 20.1 असा आहे. यामध्ये 20 ते 50 वयोगटातील नागरिक जास्त प्रभावीत असून 50 ते 80 वयोगटातील लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सद्यस्थितीत ॲक्टीव्ह कंटेनमेंट झोन 1 हजार 268 असून उच्च धोका कॉन्टॅक्ट (प्रति केस प्रमाण) 17.90, कमी धोका कॉन्टॅक्ट (प्रति केस प्रमाण) 18.63 आहे.50 वर्षावरील नागरिकांचे घरोघरी जावून तापमान व ऑक्सिजन लेव्हल याची तपासणी करण्यात येत आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या प्रत्येक कोविड-19 रूग्णांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून मेडिकल किट यामध्ये व्हिटॅमिन सी, झिंक, व्हिटॅमिन बी-12 गोळ्या तसेच ग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्क व माहिती पुस्तिका देण्यात येत आहेत. तसेच दररोज कॉल सेंटरमधून रूग्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात येत आहे. रूग्णांचा लॅब रिपोर्ट स्वयंचलित एसएमएस सुविधेव्दारे देण्यात येत आहे. डेडिकेटेड कॉल सेंटर कार्यान्वीत केले असून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोविड रूग्णांच्या आरोग्य तक्रारीबाबत तसेच कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व अन्य तक्रारी बाबत ऑगस्ट 2020 मध्ये 25 हजार 897 कॉल करण्यात आलेले आहेत. बेडस् चे व्यवस्थापन, आणि कोविड रूग्णांच्या प्रवेशासाठी रूग्णालय शोधण्यासाठी रूग्णांना मदत करणे यासाठी बेड उपलब्धेबाबत कॉल सेंटर कार्यान्वीत करण्यात आले असून प्रत्येक डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलच्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कॉल असिस्टंस सुविधा 24 x7 उपलब्ध आहे. 30 जुलै पासून आत्तापर्यंत 868 कॉल आले असून यामध्ये 538  कॉल रूग्णांना बेडस् उपलब्ध करून देण्याबाबत तर 330 कॉल इतर माहितीसाठी आले आहेत. कोविड रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी डेडिकेटेड हॉस्पीटलच्या ठिकाणी हेल्प डेस्क सुविधा सुरू करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, चाचणी सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी 40 हजार ॲन्टीजेन टेस्ट किट जिल्हा वार्षिक योजना निधीतून खरेदी करण्यात येत असून अधिकची 50 हजार किटचीही मागणी करण्यात आली आहे. 10 हजार किट जिल्हा परिषदेच्या एसईएस फंडामधून खरेदी करण्यात येत आहेत. पल्स ऑक्सिमिटर 1 हजार 953 असून थर्मल स्कॅनर 2 हजार 301 आहेत. तसेच 6 फिजीशियन, 300 नर्सेस, 65 आयुष वैद्यकीय अधिकारी, 48 डाटा एन्ट्री ऑपरेटर व 17 लॅब्रॉट्ररी टेक्नीशियनची कोविड भरती करण्यात आली आहे.कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी प्रसार माध्यमे, युट्युब चॅनेल, प्रत्येक तालुक्यात दोन वाहनाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच 6 रेडिओ जिंगल्सचे प्रसारण सूरू झाले असून 6 व्हिडीओ क्लिप तयार आहेत. मोबाईल व्हॅन आणि एलईडी व्हॅनही प्राप्त झाल्या आहेत. 100 स्टँडीज प्रदर्शित करण्यासाठी तयार आहेत. त्याचबरोबर होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स व पाम्पलेटव्दारेही जनजागृती करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments