कोरोना जनजागृती बाबत राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन ; ५००० रुपयांचे प्रथम बक्षीस 

कोरोना जनजागृती बाबत राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन ; ५००० रुपयांचे प्रथम बक्षीस 


 


कोरोना जनजागृती बाबत राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन ; ५००० रुपयांचे प्रथम बक्षीस 
माणदेश एक्सप्रेस न्युजमाळशिरस/विष्णू भोंगळे : सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणू ने धुमाकूळ घातला असून या विषाणुमुळे नागरिकांमध्ये अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत जनमानसात जनजागृती व्हावी म्हणून, राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गणेश जाधव यांनी दिली.सदरची स्पर्धा ही खुली असून, या स्पर्धेत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच 18 वर्षावरील महाराष्ट्रात राहणारी कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. सदर स्पर्धेसाठी कोरोना महामारी, माणसातील देवमाणूस-डॉक्टर, पोलीस, अनाथाची माय सिंधुताई सपकाळ, लोकशाही चा चौथा आधारस्तंभ-पत्रकार, ऑनलाईन शिक्षण, अंगणवाडी ताई, असे विषय देण्यात आले आहेत. सदर स्पर्धेसाठी शब्दमर्यादा 2000 शब्दाची असून या स्पर्धेसाठी नाममात्र 200 रुपये प्रवेश शुल्क आहे.या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी 5000, द्वितीय क्रमांकासाठी 3000, तृतीय क्रमांकासाठी 2000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील निवडक निबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात येणार असून त्याची एक प्रत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांनी 31 ऑक्टोबर पूर्वी आपले निबंध गणेश लक्ष्मण जाधव, सुमित्रा कॉलनी, संग्रामनगर, अकलूज, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर 413101 या पत्यावर पाठवावेत (मोबाईल 7841847458) असे आवाहन करण्यात आले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments