Type Here to Get Search Results !

निंबवडे पुलावरून वाहून जाणाऱ्या इसमाला तरुणांनी वाचवले ; गाडी व इसमाला काढले सुरक्षित बाहेर 


 


निंबवडे पुलावरून वाहून जाणाऱ्या इसमाला तरुणांनी वाचवले ; गाडी व इसमाला काढले सुरक्षित बाहेर 
माणदेश एक्सप्रेस टीम



निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे ता. आटपाडी, जि.सांगली येथून वाहणाऱ्या गाव ओद्याला प्रचंड प्रमाणात पाणी आले असून काल दिनांक १८ रोजी दुपारी ३ पासून आटपाडी-निंबवडे मार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने वाहतुक बंद होती.




निंबवडे सह आटपाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच पूल पाण्याखाली गेले असल्याचं चित्र होते. दुपारी 3 वा पासून पावसाने जोर पकडल्याने चरायला गेलेले मेंढपाळ शेळ्या मेंढ्या सह शेतकरी वर्ग शेतात अडकून पडला. सायंकाळी बहुतेक पूल पाण्याखाली गेले निंबवडे येथे पुलावरून चाललेल्या पाण्यात एक व्यक्ती दुचाकीसह पडून वाहून जाताना तरुणांनी धाडसाने त्याला वाचवले.



यामध्ये अमर माने, समाधान पिंजारी, राम बुधावले, कुमार माने यांचा समावेश होता. सदर वाहून जाणाऱ्या इसमाचे प्राण वाचविल्याबद्दल तरुणांचे गावकऱ्यांनी कौतुक केले. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies