Type Here to Get Search Results !

मी पोकळ धमक्या देत नाही, थेट ॲक्शन करतो; संजय राऊतांचे कंगनाला प्रत्युत्तर


 


मी पोकळ धमक्या देत नाही, थेट ॲक्शन करतो; संजय राऊतांचे कंगनाला प्रत्युत्तर



मुंबई : मी पोकळ धमक्या देत नाही. मी शिवसैनिक आहे. मी ॲक्शनवाला माणूस असून मी नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, असे संजय राऊत यांनी शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर कंगनाला दिले आहे.



भाजप नेते राम कदमांनी कंगणा रानौतची तुलना झाशीच्या राणीशी करणे हा सर्वात मोठा अपमान आहे. झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्सच्या गुळण्या टाकणारे कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि राजकीय पक्ष अशा प्रकारे खऱ्या झाशीच्या राणीचा अपमान करणार असतील, तर या देशाचे राष्ट्रीयत्व काही लोकांनी किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय, अशी टीकाही संजय राऊतांना राम कदमांवर केली.



मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या प्रवृत्तींना जे पाठीशी घालतात त्या राजकीय पक्षांना मुंबईत, महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकार नाही. त्यांचे जे लोक मुंबईच्या मतांवर निवडून आले त्यांना पाकव्याप्त काश्मीरने मतदान केलं का? की, पाकड्यांनी मतदान केले? याचा खुलासा राजकीय पक्षाने करावा, असे राऊत यांनी भाजपला म्हटले आहे.



तुम्हाला लाज वाटली पाहिजे मुंबईला पाकिस्तान म्हणता. मुंबईचे पोलीस हे काय पाकिस्तानचे पोलीस आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे अतिरेकी, गुंडांचे हल्ले परतवून लावून रक्षण केले. या कोणीही व्यक्तीला मुंबईत राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही, असे खडेबोल राऊतांनी कंगणाला सुनावले आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies