विधानपरिषद उपसभापती पदासाठी महाविकास आघाडी व भाजप लढत

विधानपरिषद उपसभापती पदासाठी महाविकास आघाडी व भाजप लढत


 


विधानपरिषद उपसभापती पदासाठी महाविकास आघाडी व भाजप लढत


 
मुंबई : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. शिवसेनेकडून निलम गोऱ्हे यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून भाई गिरकर यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी-भाजप थेट सामना होणार आहे.भाजपकडून विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. भाई गिरकर सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदारपदी नियुक्त झाले आहेत. गिरकर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले असून याआधी राज्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे.


 


तर महाविकास आघाडीकडून विद्यमान उपसभापती अर्थात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. विधानपरिषद मध्ये भाजपची २३ आमदारांची संख्या आहे. परंतु हे विजयासाठी पुरेसे नसल्याने भाजपकडून उमेदवार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


 


Post a comment

0 Comments