बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर : मुख्य स्टार प्रचारक म्हणून शरद पवार

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर : मुख्य स्टार प्रचारक म्हणून शरद पवार

 बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर : मुख्य स्टार प्रचारक म्हणून शरद पवार


 


मुंबई : बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी दिल्ली केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली असून मुख्य स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार  हे असणार आहेत, अशी  माहिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूक लढवणार असून याबाबतची माहिती लवकरच राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करणार आहेत.


 


राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार  शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.


 


बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments