आरेवाडीत नवविवाहितेची आत्महत्या : हुंडाबळी कायम 

आरेवाडीत नवविवाहितेची आत्महत्या : हुंडाबळी कायम 


 


आरेवाडीत नवविवाहितेची आत्महत्या : हुंडाबळी कायम आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) : येथील अश्विगनी मारुती बाबर (वय 18) या नवविवाहितेने राहत्या घरी साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दरम्यान, तिची आत्महत्या नसून सासू व नवर्याहने तिचा घात केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी पती मारुती साहेबराव बाबर (28) व सासू दया साहेबराव बाबर (55)  यांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत घटनास्थळी व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी दुधेभावी येथील काकासो जाधव यांची कन्या अश्विवनी हिचा विवाह सहा महिन्यांपूर्वी आरेवाडी येथील मारुती साहेबराव बाबर यांच्याशी झाला होता. लग्नव झाल्यापासून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. माहेरून पैसे व सोन्याचे दागिने घेऊन ये म्हणून तिला पती मारुती व सासू दया हे तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ करत होते.दरम्यान मंगळवारी सकाळी घरात कोणी नसताना साडीने गळफास लावून तिने आत्महत्या केली. तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्याने नातेवाईकांनी तिच्या आत्महत्येबाबत शंका व्यक्त केली आहे.
या घटनेचे वृत्ता कळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेचा पंचनामा केल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.पती व सासूला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार नातेवाईकांनी घेतला होता. पोलिसांनी पती मारूती व सासू दया हिला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यानंतर रात्री उशिरा तिच्यावर आरेवाडी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून अजूनहि हुंड्याची प्रथा चालूच आहे असे दिसून येते.
या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments